शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : देवगिरी नागरी सहकारी बँक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. 11 नोव्हें. ते 20 नोव्हेंबर या दरम्यान सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाच्या माध्यमातून शहरातील, तालुक्यातील जे व्यासायिक आहेत,जे बँकेच्या आर्थिक लाभापासून,कर्जापासून,मार्गदर्शनापासून वंचित आहेत अश्या सर्वांना,खातेदारांना, छोटया व्यासायिकांना संपर्क करून त्यांच्या साठी विविध माध्यमातून उपक्रम घेत त्यांना बँकेत खाते उघडण्यापासून ते त्यांना वित्तीय कर्ज पुरवठा करून वेळेवर कर्ज जमा करून घेणे आदी मार्गदर्शन करीत ठेवीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करत सहकारातून सहकार्य,सहकार्यातून समृद्धी, समृद्धीतून यशाकडे हा मंत्र देत सहकार सप्ताह निमित्ताने सेलू शाखेत शहरातील सर्व पतसंस्था बँक यांना आमंत्रित केले होते. त्यात साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संचालक श्री दत्तात्रय आंधळे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने,डॉ. शिवाजी शिंदे, जनसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर चौधरी सेलू नागरी सहकारी पतसंस्था. आनंद नागरी पतसंस्था, देवशीष पतसंस्था, यशवंत नागरी पतसंस्था व ग्राहक वर्ग उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सुरवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सहकार गीत देवाशिष यांनी गायले. व्यसपीठावर दत्तात्रय आंधळे,रामराव लाडाने, बेलूरकर सर, डॉ.शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.डॉ. शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना बँकेच्या विविध योजनांची माहिती सांगताना ते म्हणाले की,छोट्या कर्जापासून ते गृह कर्ज,नवीन वाहन खरेदी कर्ज,शैक्षणिक कर्ज आदी विषयी आपल्या विकासाठी कसा उपयोग करून आपल्या व्यवसायची प्रगती करत बँकेच्या सहकार्यातून आपली प्रगती कशी साध्य करून घ्यायची या विषयी माहिती दिली. तर साईबाबा बँकेचे कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी सहकार चळवळीचे महत्व विषद केले.बँकेने या वर्षी दोनदा बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. सेलू शाखाने गेल्या दोन दशकात केलेल्या गौरवास्पद कार्यांची दखल घेत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बेलूरकर साहेबांनी आपल्या मनोगतात सहकार क्षेत्रातील आणी इतर क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांना मिळणाऱ्या सर्व सुख सोयीवर भाष्य करीत देवगिरी बँके मध्ये मिळणाऱ्या सुविधांचे भरभरून कौतुक केले. जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी श्री वसंतराव धर्मधिकारी यांनी सहकार गीत म्हंटले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक विश्वास देव यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक व्यवसायिक,ग्राहक, ठेविदार मोठया संख्येने उपस्थित होते.