संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी घाटंजी
घाटंजी :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड येथे जाहीर लिलाव पद्धतीने कापूस खरेदीचा शुभारंभ २१ नोव्हेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.तरी कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या वतीने कापूस यार्डवरील जाहीर लिलाव पद्धतीने होणाऱ्या कापूस खरेदीचा शुभारंभ २१ नोव्हेंबर २०२३ रोज मंगळवार पासून सुरू होत आहे. तरी कापूस विक्री करिता समितीच्या यार्डवर कापूस आणण्यात यावा. शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कापूस विक्री करू नये. शेतमालाची विक्री बाजार समितीमध्येच करावी. कापूस विक्रीस आणावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांनी केले आहे.