संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी घाटंजी
घाटंजी:- तालुक्यातील
चोरंबा येथे बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती निमित्त संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रबोधनकार गजेंद्र ढवळे यांनी तुकडोजी महाराज यांच्यावर प्रबोधन करीत गावातील लोकांना वाईट व्यसनापासून दूर राहून आज पासून कोणतेही वाईट व्यसन करणार नाही म्हणून बिरसा मुंडा जयंती दिनी शपथ घेण्याचे आव्हाहन केले आणि त्याला प्रतिसाद देत अरविंद शेडमाके नामक एका व्यक्तीने खर्रां आणि दारू पिणार नाही म्हणून बिरसा मुंडा यांची शपथ घेतली आणि गावकऱ्यांच्या वतीने अरविंद शेडमाके यांचा सत्कार करण्यात आला लोकांना व्यसनमुक्त करण्याचा या संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रबोधनकार गजेंद्र ढवळे सह ,हनुमानजी कुभरे, विलास कोरोगे,संतोष गोल्हर,गायक संतोष वानखेडे,पांडुरंगजी किरणापुरे, दिवाकर गेडाम, संदीप वाघाडे भगवान चौधरी, स्वप्नील फुसे इत्यादी प्रबोधनाचे टीम सदस्य होते.कार्यक्रमाला गावातील सरपंच सौ.ज्योती रदंये जयराम तोडसाम, वाल्मीक उरकूडे, रवी खवास,मारजी तोडसाम,गुलाब तोडसाम,सह गावातील हजारो नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले,निसर्ग पूजक बहूउदेशिय संस्थेचे अध्यक्ष बंडूदादा तोडसाम,उपाध्यक्ष श्याम मेसराम सचिव, श्रीराम मेसराम सदस्य, अमूत गेडाम सौ. योगिता तोडसाम सौ. प्रतिभा मेसराम,अदित्य धूर्वे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.