अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
वाशिम ता – जालना जिल्ह्यातील अंबड येथे होत असलेल्या ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केले आहे अंबड येथील पाचोड रोड वरील धाईतनगर येथे 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे .ही एल्गार सभा ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी 7 सप्टेंबर 2023 रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेला अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी ही एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ माजी मंत्री विजय वडेट्टीवार माजी मंत्री पंकजाताई मुंढे रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर शब्बीर अहमद अन्सारी आदी मान्यवर संबोधित करणार आहेत.त्यामुळे या सभेला ओबीसी अल्पसंख्यांक भटके विमुक्त यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा गाभणे यांनी केले आहे या एल्गार सभेच्या नियोजनाबाबत अखिल भारतीय महात्मा समता महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज ता 11 रोजी वाशिम येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष गोमाशे, जिल्हा सचिव विठ्ठल भागवत जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव राऊत जिल्हा संघटक गजानन टोणपे मालेगाव तालुकाध्यक्ष कपिल भालेराव कारंजा तालुका वसंतराव मारोटकर मंगरुळपीर तालुका अध्यक्ष तुषार जवके डॉ सुनील राऊत जावेद भवानीवाले ,चंद्रकांत गायकवाड बाजीराव डांगे गुरुजी आदी उपस्थित होते