कैलास पाटेकर
ग्रामीण प्रतिनिधी ढोरजळगाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरजळगाव शे. याठिकाणी दिपावली पाडवा निमित्ताने माजी विद्यार्थी सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर श्री वसंत गिऱ्हे हे होते. शाळा डिजिटल करणे तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मेळाव्यात चर्चा करण्यात आली. मेळाव्यासाठी डॉ. सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख, श्री.महादेव पाटेकर, श्री.गणेश पाटेकर, श्री. भाऊसाहेब अकोलकर, डॉ. श्री.देवीदास देशमुख, श्री संतोष हंबर, श्री रोहन साबळे, श्री बाळासाहेब खोसे, श्री दीपक खोसे, श्री जगदीश सोलाट साहेब, श्री. प्रल्हाद देशमुख, श्री. शरद खोसे श्री कैलास पाटेकर,दादासाहेब लबडे,श्री संतोष अकोलकर, आप्पासाहेब बर्गे, बाळासाहेब खवले आदीसह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भाऊसाहेब अकोलकर यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री गोरक्षनाथ दुसुंगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.देविदास देशमुख यांनी केले