निशांत मनवर
शहर प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड (दि. 11 नोव्हेंबर) शहरामधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार लपविण्याकरिता आणि विभागाच्या भ्रष्टाचाराबद्दल पत्रकारांनी कोणताही बातमी प्रसिद्ध करून जनतेचा आवाज उठवू नये म्हणून पत्रकारांची मुस्काट दाबी करून लाखो रुपयांचा वाटप सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कार्यकारी अभियंता प्रमोद दुधे आणि उपअभियंता वसंत खसावत आणि ढोले हे दुधे यांच्या शासकीय निवासस्थानी प?कारांना बोलवून विभागाचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून दिवाळीच्या नावाखाली,दहा हजार, पाच हजार, तीन हजार दोन हजार रुपयांचे पॉकेट करून वाटप केले आहेत.यावरून असं लक्षात येते की सार्वजनिक बांधकाम उपविभागातील खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे.आणि यांच्यावर संबंधित प्रशासनाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.आणि यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या विभागाकडे लक्ष देणार का असा प्रश्न जनतेला पडला आहे.उमरखेड शहर व तालुक्यातील अनेक वर्षांपासून नवीन रस्ता, रस्ता दुरुस्ती, पुल बांधणे, ढाणकी रोड, टाकळी रोड अशा अनेक खेडेपाड्यातील रस्त्यांची खूप दुरवस्था झालेली आहे.
व त्या रस्त्याची दुरुस्ती अजूनही झाली नाही.
अशा बऱ्याचशा समस्यांचे व मागण्यांचे निवेदन कार्यालयामध्ये गावकऱ्यांनी केलेले असून पण आजपर्यंत ह्या समस्या आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. कारण भ्रष्टाचार करण्या व्यतिरिक्त कोणतेही जनतेचे काम करण्याची अधिकाऱ्यांना फुरसत मिळत नाही. असे दिसून येत आहेत.प्रमोद दुधे आणि वसंत खसावत आणि ढोले यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी जनतेची मागणी जोर देत आहे.