(जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण प्रकरण)
निशांत मनवर
शहर प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड (दि.12 नोव्हेंबर)
फिर्यादी दिलीप यादव शिंगणकर वय 46 वर्ष जात महार व्यवसाय शेती रा. बेलखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या तक्रारी वरून उमरखेड पोलिस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिलीप यादव शिंगणकर हे शेती करून स्वतः च्या परिवाराचे पालन पोषन करतात. व स्वतःच्या शेतीची राखनी करीता चार पाळीव कुत्रे आहेत ते शेतात राहतात.दि.07/11/2023 रोजी 02/00 वा दरम्याण मी माझ्या शेतात गेलो असता शेतातील पाळीव चार कुत्र्यांपैकी एक कूत्रा दिसला नाही.तेव्हा मी माझ्या शेत शेजारी आरोपी नामे पवन सुधाकर चव्हाण वय 20 वर्ष रा. कैलास नगर, बेलखेड जात बंजारा असून .मी पाळलेल्या चार कुत्रा पैकी मला एक कुत्रा न दिसल्याने मी पवन सुधाकर चव्हाण यांच्या शेतात माझ्या मोटार सायकलने गेलो असता तेथे माझा कुत्रा बांधलेला दिसला मला पहाताचे पवन सुधाकर चव्हाण यांनी कूत्रा सोडला मी त्यांना तू माझा कूत्रा का बांधुन ठेवला आहे.
याबाबत विचारले असता त्यांनी मला सांगितले की, तुमचा कूत्रा कोठे आहे मला माहित नाही असे म्हणुन मला माझे जातीवर महाऱ्या, धेडग्या अशी जातीवाचक शिविगाळ केली.व त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने माझ्या मोटार सायकलच्या डोम पर मारुन डोम फोडुन नुकशान केले व माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर, माडीवर व कंबरेवर कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहान केली.तेव्हा मि त्यांचे पासुन माझा जिव वाचवून जात असतांना त्यांनी मला म्हणाला परत जर माझ्या शेताकडे आला तर जिवाने मारल्याशिवाय राहणार नाही. अशी धमकी दिली म्हणून चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार शिंगणकर यांनी केली आहे.
आरोपी पवन सुधाकर चव्हाण राहणार कैलास नगर बेलखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 326, 504, 506 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक 1989 नुसार 3(1) (r), 3(1) (s), 3(2) (vs) ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशन ते ठाणेदार शंकर पांचाळ हे करीत आहेत.