सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
आळेफाटा :- पिंपळवंडी ( ता .जुन्नर ) येथील काकडपट्टा शिवारात रोहित्रावर काम करत असलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यु झाला असल्याची घटना रविवारी (दि १२) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली .संदेश नवले (रा .कुरण ता .जुन्नर जि .पुणे )असे या तरुण वायरमनचे नाव आहॆ या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात शोककळा पसरली आहे .याबाबत मिळालेली माहिती अशी की महावितरण कंपनीत नोकरी करत असलेला संदेश नवले हे तीस वर्षीय तरुण वायरमन रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपरी पेंढार रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्रावर काम करत होता त्याने लिंक पाडून ठेवल्या होत्या व तो या रोहित्राचे काम करत होता अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर त्याला जबरदस्त शॉक लागला व त्याचा जागीच मृत्यु झाला .घटना घडली त्यावेळी काम सुरू असलेल्या ठिकाणी तेथील काही ग्रामस्थ उपस्थित होते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे .