विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: उमरखेड तालुक्यातील धानोरा (स) येथे आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल से जल ही योजना प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत आमदार ससाने यांनी बोलू लागली. येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातील कोणत्याही समस्या असो रस्ते लाईट पाणी आरोग्याच्या दृष्टीने जे काही समस्या असतील ते आम्ही तात्काळ मार्गी लावणार असल्याचे मत आमदार ससाणे यांनी व्यक्त केले. यावेळी नितीन भुतडा जिल्हा समन्वयक भाजपा यवतमाळ बळवंतराव नाईक सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुदर्शन रावते तालुका अध्यक्ष भाजपा प्रकाशराव जाधव सरपंच धानोरा उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.