संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी घाटंजी
घाटंजी:- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मंगी (सावरगाव) येथील पोच्यारेड्डी जिद्दीवार माजी अध्यक्ष विविध कार्यकारी संस्था पारवा यांच्या घरी आर्णी केळापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपभाऊ धुर्वे यांच्या अध्यक्षते खाली पारवा कुर्ली सर्कंल मधील शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिवाळी निमित्ताने स्नेह भेट व या भागातील कार्यकर्ते यांच्या सोबत विकास कामाबाबत चर्चां करण्यात आली. यावेळी आरोही अनिल जिद्दीवार हिच्या व माजी उपसभापती सुहास पारवेकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. एखाद्या सामान्य कार्यंकर्तां यांच्या घरी जाऊन आमदार संदीपभाऊ धुर्वे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला हे विशेष यावेळी आमदार संदीपभाऊ धुर्वे व विवासवान धुर्वे सोबत अर्जुन आत्राम सचिनभाऊ पारवेकर, सुहास पारवेकर, गँगय्या बड्डीवार, भगवान सकन्नवार, नितीन नारलावर, जनार्धन उप्पावार, मनोज कन्नलवार, रामदास चौधरी, दत्ता मोहूर्ले, प्रशांत दोनतुलवार, गोवर्धन गडमवार, अशोक संकुरवार, दिलीप राठोड, सह सावरगाव मंगी सावंगी धामणधरी ठाणेगाव गणेरी वघारा कुर्ली राजपेट नारायणपेठ रामनगर पारवा पार्डी इत्यादी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामे यावर चर्चा या भागातील विद्युत वितरण व वन्यप्राणी यांच्या मुळे शेती पिकाचे होणार नुकसान यांच्या समस्या गाव निहाय नागरिकांनी आमदार यांना सांगण्यात आले