अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा 2023 ह्या चालू झाल्या असून त्याचा वेळापत्रक आलेला आहे परंतु आरोग्य विभागाच्या परीक्षा सुद्धा ह्या 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान आहेत त्यामुळे या दरम्यान हिवाळी 2023 परीक्षा झाल्यास असंख्य विद्यार्थी आरोग्य विभागाच्या परिक्षेपासून वंचित राहू शकतात तरी त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या हित लक्षात घेता ह्या दरम्यान येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलन्यात याव्या.या मागणीचे निवेदन परीक्षा विभाग प्रमुख मोनाली तोटे यांना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांनी दिले.