संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली.
कणकवली तालुक्यातील श्री. सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवलीचा व्दितीय व तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून.या महाविद्यालयातून व्दितीय वर्षात कु.भक्ती राऊत व तृतीय वर्षात कु. फरझाना काझी यानी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे, अंतर्गत श्री. सरस्वती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, तोंडवलीच्या पदवीचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला असून व्दितीय वर्षातील सत्र चौथे व सत्र सहाव्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. व्दितीय वर्षातील चौथ्या सत्रात प्रथम कु भक्ती राऊत, व्दितीय कु. दिव्या तोडणकर,तृतीय कु. तन्वी वाटवे हिने पटकावला. तर तृतीय वर्षातील सहाव्या सत्रात कु. फरझाना काझी प्रथम, मनस्वी लाड द्वितीय तर विद्या कोकरे हिने तृतीय क्रमाक प्राप्त केला. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंत सावंत, सचिव श्री. निखिल सावंत. यांनी अभिनंदन केले.तर विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. तुकाराम केदार , व सर्व प्राध्यापक वर्गांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर स्टाफचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
फोटो :
- कु. भक्ती राऊत
- कु. दिव्या तोडणकर
- कु. तन्वी वाटवे
- कु.फरझाना काझी
5 कु. मनस्वी लाड - कु.विद्या कोकरे