भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर – देश स्वतंत्र झाला आहे तसेच सर्वंच क्षेत्रात आपण प्रगती केली असुन आजही मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता असुन बहुसंख्य समाज घटक हा आर्थिक पारतंत्र्यात असल्याचे प्रखड मत भारतीय स्टेट बँकेच्या विविध अधिकारी पदाला न्याय देत गरजावंताना होतकरुंना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले व्यक्तिमत्त्व. उत्कृष्ट सेवानिवृत्त अधिकारी बाबाराव गोविंदराव पवार यांनी आपल्या सत्कार समारंभात जाहीर मत व्यक्त केले.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत व अल्प भूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि परिस्थितीचा बाऊ न करता कुशाग्रह बुध्दीमतेचे धनी यांनी प्रथमीक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मुरली या त्यांच्या मुळ गावी घेउन माध्यमिक शिक्षण.माहुर येथे पैदल व तदनंतर सायकलने खडतर प्रवास करत पुर्ण केला सदर परिस्थिती हलाखीची असुन त्यावर मात करून आपल्या वर्गातील प्रथम क्रमांक त्यांनी कधीही ढळू दिला नाही यातच त्यांचे बौद्धिक क्षमता चे गुणवत्ता आणि प्रासंगिकता दिसून येते.पुढील उच्च शिक्षणासाठी नांदेड येथील नामावंत महाविद्यालयात गुणानु क्रमाने प्रवेश निश्चित झाला पण आर्थिक परिस्थितीशी सतत झगडणाऱ्या या नवतरुणाला चिड निर्माण झाली व त्यांनी कुणाकडे मदतीची याचना न करता स्वाभिमानाने स्वमार्गाने बी.एस्सी.गणित या विषयामध्ये धर्माबाद.नौकरी सह सी.ए.आय.आय.बी.शिक्षण यशस्वी रित्या गुणानु क्रमाने पुर्ण करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवा आदर्श निर्माण केला.भारतीय स्टेट बँकेच्या सेवेत प्रदापर्ण करत सेवानिवृत्त पर्यंत बहुसंख्य गरजावंतांना बॅकेंच्या सर्वंच नियमाचे आधिन राहुन व वास्तव परिस्थितीचे त्यांचे बौद्धिक कौशल्याच्या बळावर कर्ज स्वरूपात विविध क्षेत्रात कार्यरत गरजावंतांना कर्ज वाटप केले.नियमीत परतफेड करुन सदर कर्ज लाभ धारकाला सन्मानीत करण्याचे आशिर्वाद पर कार्य सुध्दा बी.जी.पवार यांनी केले. पवार यांनी एवढ्यावरच न थांबता आपले लहान भाऊ यांना मॅकेनिकल इंजिनीयर व सेंटर एक्ससाईज ऑण्ड कस्टम या मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत केले तसेच त्यांच्या अर्धांगिनी सौ.शिला बाबाराव पवार सुध्दा उत्तम गृहिणी ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्वदुर सुपरिचित आहेत बी.जी.पवार यांनी सामाजिक,आर्थिक, औद्योगिक, क्रीडा, आरोग्य, अशा एकान एक क्षेत्रात भरीव मार्गदर्शन केले.तुमचे मौल्यवान मार्गदर्शन मिळत राहो असे ज्ञानकल्पना प्रतिष्ठान राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष निरधारी जाधव यांनी समानतेच्या योगाने व्यक्त केले.