शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
मोफत शिक्षण हक्क
कायद्याअंतर्गत अनुदानीत शाळांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असताना देखील सेलू येथील ज्ञानतीर्थ विद्यालय या शाळेतील मुख्याध्या पकाकडून पालकांची आर्थिक लुट होत असलेल्या तक्रारी बाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू कडे तक्रारी आल्या कारणाने गटशिक्षण अधिकारी सेलू यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू येथील प्राथमीक शाळेतील मुख्याध्यापक हे शैक्षणिक फीसच्या नावाने पालकांची आर्थिक लुट करताहेत.जे पालक आपल्या पाल्याची फीस भरत नाहीत अशा विद्यार्थांना मुख्याध्यापक हे घटक चाचणी,प्रथमसत्र परीक्षेस बसू देत नाहित.शैक्षणिक फीस जे भरत नाहित अशा विद्यार्थाना परीक्षे पासुन वंचीत ठेवतात व विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान करतात.
शाळेचे गणवेश, वह्या, पुस्तके,बुट,साॅक्स,दप्तर ह्यावर व वह्यावर शाळेची जाहिरात आसनारे एम आर पी नुसार शाळेतूनच घेण्यास भाग पाडतात खर तर याच कंपनीच्या वह्या बाहेर 15% कमी कीमतीने बाजारात मिळतात परंतु बाहेरून खरेदी करण्यास मुख्याध्यापक मनाई करतात. जे विद्यार्थी शाळेचे नाव नसलेले दप्तर घेत नाहित त्यांना शिक्षा करतात. अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलूच्या वतीने गटशिक्षण अधिकारी सेलू यांना व माहितीस्तव मुख्यकार्यकारी अधीकारी परभणी, शिक्षण अधिकारी प्राथमीक,माध्यमिक यांना देण्यात आले. व लवकरच या विषयी चौकशी करून याचा अहवाल अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू यांना कळवण्याची मागणी करण्याची आली आहे.


