रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
व्यसनमुक्त समाज हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत लोकजागर मंच संस्थापक अध्यक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशा ध्यक्ष अनिल गावंडे यांनी हिवरखेड येथे चक्क सातशे लिटर दुधाची कोजागिरी आयोजित केले होती.हिवरखेडच्या
कस्तुरबा गांधी विद्यालया च्या निसर्गरम्य परिसरात दि 31च्या रात्री हजारो लोकांनी लोकजागरच्या कोजागिरीचा आस्वाद घेतला.उंच उंच वृक्षांनी वेढलेला परिसर त्यावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई सोबतीला मंद धुंद संगीत आणि अशा वातावरणात हाती दुधाचा ग्लास यामुळे आणखीच गोडी वाढली. शरदाच्या टपोऱ्या चांदण्यात, कार्तिक मासाच्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गुलाबी थंडीत या कोजागिरीने एक वेगळीच ऊब निर्माण केली व ऊर्जा प्रदान केली. या ,बसा, मनमोहक वातावरणाचा आनंद घेत ममसोक्त कोजागिरीचा आस्वाद घ्या, एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तुम्हाला हवे तेवढे दुधाचे ग्लास प्या व तृप्त व्हा या अनिलभाऊं च्या कल्पनेने अनेकांनी समाधानाचे ढेकर दिले. जात, धर्म, पक्षभेदाच्या भिंती ओलांडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे व बंधुभाव निर्माण करण्याचे काम केले.व्यापारी-शेतकरी-गरीब-श्रीमंत-शिक्षित-अशिक्षित अशा समाजातील सर्वच वर्गातील लोकांची
उपस्थिती लक्षणीय होती. या कोजागिरीच्या निमित्ता ने कमीत कमी 50 लोकं तरी आज दारू ऐवजी दूध पिले असतील अशी प्रतिक्रिया एका सद्गृह स्थाने व्यक्त केली. या वरून कार्यक्रमाचे सार्थक झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हिवरखेड, सौन्दळा, कार्ला, वारखेड, अडगाव इत्यादी गावातील हजारो लोकांनी कोजागिरी चा आस्वाद घेत अनिल भाऊ गावंडे यांना शुभेच्छा दिल्या.