रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र शालेय व क्रीडा विभाग संचालनालयाचे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयातील कु. मयुरी सुभाषराव नराजे हिने हातोडा फेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. या वर्षी सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनींनी जिल्हास्तर व विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. या राज्यस्तरीय सह भागासाठी झालेली खेळाडूंची निवड विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रावला गेला असल्याची प्रतिक्रिया महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी व्यक्त केले. या क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, संस्थेचे कोषाध्यक्ष पुखराज राठी,कार्यवाह श्यामशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, युवा संचालक प्रा.कौस्तुभ भोपळे तथा समस्त संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेतील खेळाडू सहभागासाठी भोपळे कॉलेजचे प्राचार्य संतोषकुमार राऊत, तालुका क्रीडा संयोजक शांतीकुमार सावरकर, तालुक्यातील क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थीनी क्रीडा प्रमुख पद्मा टाले, दुर्गा बोपले, आरती इंगळे, प्रतिभा चोपडे, मयूर लहाने, निलेश गिऱ्हे, रंजित राठोड,निलेश कासोटे, सुनील वाकोडे, महिला पालक प्रतिनिधी स्वाती गावंडे, सुलभा गावंडे, मंदा पिंपळकार,चित्ररेखा गावंडे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे, क्रीडा सहाय्यक दिनेश शर्मा, गौरव डालके आदींनी सहकार्य केले.