प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२७ ऑक्टोंबर सर्व मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यत पाथरी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये नेते ,मंत्री, आमदार, खासदार, पुढारी, प्रवेश बंदी केली आहे .त्यातीलच एक भाग म्हणून पोहे टाकळी येथे प्रवेश बंदी केली आहे .सर्व ग्रामस्थांनी राजकीय लोकांना इशारा दिला आहे .की आमच्या मतावर तुम्ही मोठे होता आणि आम्ही आरक्षण मागितले की मागे सरकता खबरदार आमच्या गावात येताल तर जर आमच्या गावात तुम्ही पाऊस ठेवला तर ग्रामस्थांच्या वतीने तुमचा अपमान केला जाईल. तुम्हाला गावाच्या बाहेरून वापस फिरावे लागेल .जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांनी गावात येऊन आपला अपमान करून घेऊ नये .असा अल्टिमेट दिलेला आहे. आणि ग्रामस्थांनी असाही निर्णय घेतला आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या सभेला व कार्यक्रमाला जायचे नाही. आपला घरचा जरी राजकारणी असला तरी त्याच्या सहज जायचे नाही. असा निर्णय ग्रामस्थांनी गावातील आराध्य दैवत मारुती राया च्या मंदिरात मारुतीराया समोर छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी मानून शपथ घेतली आहे. असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे. पोहे टाकळी गावातील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाहीत पूर्ण गाव आणि बहिष्कार टाकलेला आहे. प्रत्येक गावागावात आता मराठा आरक्षणाचा लढा उभारल्या जात असून राज्य सरकारने टिकणारे आरक्षण ताबडतोब मराठा समाजाला द्यावे अशी मागणी सर्व गावागावातून होत आहे. मनोज जरंगे यांनी सरकारला ४०दिवसाची मुदत दिली होती. ती मुदत २४ ऑक्टोंबर रोजी संपलेली असून दि.२५ ऑक्टोंबर पासून पुन्हा जिरंगे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने अनेक गावांमध्ये साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. आता नाही तर कधी नाही अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झालेली असून. सर्व गावातील लोकांनी मनोज जरंगे यांना पाठिंबा दर्शवत नेतेमंडळींना व राजकीय लोकांना गाव बंदी केल्याचे फलक गावातील पाठीवर प्रवेशद्वारावर लावली आहे.