मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे: म.रा.आरोग्य खाते व गटप्रवर्तक संघटना तह आयटक तालुका चांदुर रेल्वेचे वतीने आशा स्वंयसेविका यांचेवर ऑनलाईन कामाबाबत होत असलेली सक्ती व दडपशाही त्वरित थांबविण्यात यावी व आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तिकांना किमान वेतन व दिवाळी बोनस मिळण्याबाबतचे निवेदन मा.तहसीलदार यांचे मार्फत मा.आरोग्य मंत्री, मा.प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांना देण्यात आले. महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सत्तर हजार आशा स्वंयसेविका कार्यरत आहेत. या स्वंयसेविकांना कामावर आधारीत मोबदलामिळतो.आशास्वंयसेविका या आरोग्याचे महत्वाचे काम करत असून त्या आरोग्य विभागाच्या कणा आहेत. शासनाच्या आरोग्य विषयक योजना जनते पर्यंत पोहचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्यात 2005 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरूवात झाली तेव्हा कमी शैक्षणिक पात्रता व आदिवासी भागात निरक्षर असलेल्या व साधारणतः सहावी,सातवी,आठवी, नववी, दहावी पास असलेल्या महिलांना आशा स्वंयसेविका पदी नियुक्ति देण्यात आली. त्यांना इंग्रजी सफाईदार पणे लिहीता वाचता येत नाही. परंतु आरोग्य विभागाकडून आशा यांना बहुतांश इंग्रजीत असलेल्या appवर अनेक कामे करण्याची सक्ती केली जात आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात नेट कनेक्टिव्हिटी सहजपणे उपलब्ध नसते.त्या मुळे आन लाईन कामे वेळेत पूर्ण होत नाही. आनलाईन कामावर बहिष्कार टाकून सुद्धा ती कामे करण्याची शासनाकडून सक्ती केली जात आहे. म्हणून आशा स्वंयसेविकांनाकोणत्याही प्रकारची आनलाईन कामे सांगण्यात येवू नयेत. दर वर्षी दिवाळी पूर्वी एक महिन्याच्यामोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा, व किमान वेतन लागू करा अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यापूर्वीआशास्वंयसेविका व गटप्रवर्तका यांनी घोषणा बाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला.