संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
रंगोत्सव स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आदरणीय अनिलपंत डेगवेकर साहेब उपस्थित होते . यावेळी इंग्लिश मिडियम स्कूल मधिल इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थांनी चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या कलेच्या विकासाला प्राधान्य दिले गेले. विद्यार्थांनी विविध कलाविष्कारातून सर्जनशिलपणा चित्रांच्या माध्यमातून मांडणी केली होती. या रंगोत्सव चित्रकला स्पर्धा राष्ट्रीय दर्जच्या घेण्यात आल्या . विद्यामंदिर इंग्लिश स्कूल मधिल विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल, सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र इ. मिळवून इंग्लिश स्कूलच्या यशाच्या शिखरात मानाचा तुरा खोवला गेला. रंगोत्सव उपक्रमासाठी इंग्लिश स्कूल मधिल ड्रॉईंग टिचर मुख्याध्यापिका सौ राणे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी खूप परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला . संस्थेचे विश्वस्त श्री डेगवेकर साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना आपल्या शुभहस्ते बक्षिस देऊन विद्यार्थांचे कौतुक केले . विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.जे कांबळे , पर्यवेक्षक सौ . जाधव मॅडम ,जेष्ठ शिक्षक श्री वणवे , ड्रॉईंग टिचर श्री राणेसर. आदी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते . तसेच रंगोत्सव स्पर्धेतेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शनही केले . या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून विद्यार्थांना प्रोत्साहन दिले . मुख्याध्यापिका सौ . राणे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता झाली .