रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा – महाराष्ट्र शालेय व क्रीडा विभाग संचालनाल याचे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालया च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून या स्पर्धेत विविध खेळ बाबीत नऊ सुवर्ण पदक तर दोन रौप्य पदका ची कमाई या स्पर्धेत केली आहे. यात मुलांच्या गटा तील सुबोध नितीन बावणे व नितीन प्रशांत देशमुख यांनी हर्डल्स या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच विविध वयोगटनिहाय मुलीच्या गटात प्रणिता राजेश गावंडे हिने ८० मीटर हर्डल्स, मयुरी सुभाष नराजे हातोडा फेक, रेणुका संतोष राऊत- हातोडा फेक, पूनम सुभाष अंभोरे, गायत्री संजय भटकर,गौरी बाळकृष्ण बिलोने ,गौरी सुनील ढोकणे ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उंच उडीमध्ये गौरी सुधाकर कोरडे व पूनम संतोष अंभोरे हिने हातोडा फेक क्रीडा बाब स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. या क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे, संस्थेचे कोषाध्यक्ष पुखराज राठी, सहकार्य वाह स्नेहल भोपळे तथा समस्त संस्थेचेपदाधिकारी, संचालक मंडळ यांनी कौतुक केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी सुद्धा खेळाडूंचे कौतुक करून ग्रामीण पातळीवर शासनस्तरावरून क्रीडाविषयक अपुऱ्या सुविधा असतांना त्यावर मात करित खेळाडू विद्यार्थ्यांनी यश साध्य केले असून त्यांना संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आश्वासित केले. या स्पर्धेतील खेळाडू सहभागासाठी भोपळे कॉलेजचे प्राचार्य संतोषकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थीनी क्रीडा प्रमुख पद्मा टाले, दुर्गा बोपले, आरती इंगळे,रंजित राठोड, मयूर लहाने, निलेश कासोटे, सुनील वाकोडे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे यांनी सहकार्य केले.