दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : जव्हार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी उत्कृष्ट गणराया पुरस्कारासाठी समिती गठित करण्यात आली होती. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलिसांकडून जव्हार येथील सार्वजनिक गणेश मंडळ श्रीराम मंदिरला प्रथम क्रमांक गणराया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक नवतरुण मित्र मंडळ नवापाडा तृतीय क्रमांक अंबिका मित्र मंडळ अंबिका चौक उत्तेजनार्थ सार्वजनिक गणेश मंडळ जामसर यांना गणराया पुरस्काराने जव्हार पोलीस ठाण्याकडून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे आजच्या डिजिटल युगात देखील कल्पनाशक्ती चे चांगले व प्रेरणादायी असे दृश्य पाहायला मिळणे ही वेगळी पर्वणी होती.जव्हार पोलीस ठाणे यांच्या कडून गणराया पुरस्कारासाठी समिती गठीत करण्यात आली होती. ज्यात दीपक भिसे, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक भिसे, दक्षता समिती सदस्य यांचा समावेश होता या समितीकडून स्टेज उंची, पार्किंग, सीसीटीव्ही, शासकीय परवाने, देखावा, प्रतिष्ठान पासून दहा दिवसाची शिस्त, ध्वनी व्यवस्था पारंपारिक वाद्य, वेळेचे पालन, विसर्जन मिरवणुकीतील शिस्त, सामाजिक कार्य, स्पर्धा असे सर्व निकष तपासून गुणांकन करण्यात आले होते.या वेळी जव्हार पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे, कॅप्टन विनीत मुकणे, चर्मकार आयोग समिती सदस्य, तहसीलदार लता धोत्रे, उपप्राचार्य डॉ. हेमंत मुकणे यांच्या उपस्थितीत वरील मंडळांना गणराय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन गोपनीय अंमलदार कैलास राठोड यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन आहेर यांनी केले.











