शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन सुरुच जिल्हा दणाणला.
परभणी : दि.03 कंत्राटी पध्दतीने शिक्षक व कर्मचारी भरतीसह कमी पटसंख्या असणार्या शाळांचे समूह शाळेत रुपांतर तसेच शाळा दत्तक योजनेचा शिक्षण विरोधी निर्णयाचा मंगळवारी (दि.03) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षण संस्थाचालक महामंडळ, मुख्याध्यापक संघ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा संवर्धन मंडळ व जिल्हा क्रिडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्या दिवशीही जोरदार धरणे आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, जिल्हा संवर्धन मंडळ, जिल्हा क्रिडा शिक्षक संघटना यांच्या भक्कम सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात तीन दिवशी य धरणे आंदोलन सुरु केले. मंगळवारी म्हणजे दुसर्या दिवशीच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश रद्द करा, समूह शाळांचा आदेश रद्द करा, शाळा दत्तक योजनेचा आदेश रद्द करा, अशा जोरदार घोषणा देवून आंदोलन कर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष धारासूरकर, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, जिल्हा उपा ध्यक्ष सूर्यकांत हाके, जिल्हा कार्याध्यक्ष उदय देशमुख, अजयराव गव्हाणे, गणपतराव भिसे, जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष राजू शिंदे, शारिरिक शिक्षक संघटनेचे महानगरा ध्यक्ष सुशील देशमुख, मराठवाडा शिक्षक संघाचे नेते यशवंत मकरंद, नितीन लोहट, के.पी. कनके, महाराष्ट्र क्रिकेट असेसिएशनचे सहसचिव संतोष अण्णा बोबडे, धन्य कुमार शिवणकर, केशवअण्णा दुधाटे, रणजित काकडे, पी.आर. जाधव, माधवराव शिंदे, बाळकृष्ण कापरे, बी.एम. कांदे, सुनील रामपुरकर, विवेक दिवाळकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, प्रविण सोनवणे, पंडीत, अनिल तोष्णीवाल, गणेश शिंदे, प्रल्हाद लाड, संतोष गायक वाड, राखुंडे, दिंगबरराव मोरे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र लहाने आदी या आंदोलनात सहभागी होते. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले व एकजूटीने हा लढा उभारण्याचा संकल्प जाहीर केला.