अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
करंजी: आज दिनांक.१/ऑक्टोबर ढोरजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाकाडे वस्ती या शाळेत स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत श्रमदान करताना गावचे सरपंच गणेश जी कराड, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार कराड, गोरक्ष कराड, शाळेच्या मुख्याध्यापिका खोशे मॅडम व विद्यार्थी यांनी शाळेत स्वच्छता करून या ठिकाणी एक तास श्रमदान केले आहे. श्रमदान उपक्रमामध्ये शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. हा उपक्रम शालेय शिक्षण विभाग भारत सरकार यांनी पंधरवडा दिन घोषित केला आहे श्रमदान दिवस एक ऑक्टोबर पासून संपूर्ण देशामध्ये पंधरवडा दिवस राबविण्यात येत आहे. या श्रमदान शाळेचा परिसर स्वच्छ करण्याचे काम शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक व गावचे सरपंच श्री गणेश जी कराड, या शाळेत स्वच्छता दिन दिवस म्हणून शाळेची स्वच्छता करण्यात आली आहे.१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर श्रमदान दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंधरवाडा दिवस श्रमदान म्हणून घोषित करण्यात आला आहे.

