परवेज खान
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा: मराठा कुणबी आरक्षणा नंतर आता राज्यातील धनगर समाजाने त्यांच्या समाजाला अनुसुचित जमातीत समावेश करण्याची मागणी करत अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आमरण उपोषण सुरू केले होते, यावेळी आपले सरकार धनगर समाजाला अनुसुचीत -जमातीत समावेश करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत असुन यासाठी ५० दिवसाची मुदत मागीतली आहे. त्यामुळे आदीवासी समाजातर्फे सरकाला सांगणे हेच की धनगर समाजासह अन्य कोणत्याही समाजाचा अनुसुचीत जमाती मध्ये समावेश करू नये, कारण आमच्या समाजाला केवळ ७ टक्क्यांचे आरक्षण १९५० ला मिळाले आहे. आता राज्यात आदीवासींची संख्या दुप्पट झाली आहे त्यामुळे ७ टक्के ऐवजी १० टक्के आरक्षणाची गरज असतांना असलेल्या ७ टक्क्यामध्ये पुन्ह: इतर समाजाचा समावेश नको. या मागणीसाठी पांढरकवडा येथे दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी आदिवासी बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला भारत सरकारचे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी धरणे आंदोलना स्थळी भेट दिली आणि आंदोलनाच्या संपूर्ण मागण्या शासन दरबारी पाठपुरवठा करू तुमच्या आदिवासीला आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे आश्वासन त्यांनी समाज बांधवांना दिले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर विधानसभा क्षेत्रातील आदीवासी समाज बांधवाकडून अनुसुचीत जमातीत इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यात येऊ नये अशी मागणी आदिवासी बचाव संघर्ष समितीचे संयोजक बंडू सोयाम यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे त्यांनी आपल्या भाषणामध्ये जर आरक्षणाला धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून अशी महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला आहे आपल्या भाषणातून त्यांनी मत प्रगट केले आहे धरणेआंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते आणि समाज बांधवांना संबोधित करताना आदिवासी बचाव संघर्ष समितीचे नेते भाऊराव मरापे बबनराव सोयाम यांनी आपलं मत व्यक्त केले आहे त्याचबरोबर धरणेआंदोलनाला उपस्थित असलेले समाज बांधव अंकित नैताम रितेश परचाके वामनरावजी सिडाम वासुदेव शेंडे सर भैय्या ठमके गणेश आतराम संभाजी मडावी नागोराव इचोळकर विलास जुमनाके नागोराव गेडाम योगेश शेडमाके सुनील सिडाम अक्षय सिडाम विनोद कनाके सुमित गेडाम संतोष पेदोर अजय कुमरे सागर मडावी सुवर्णा वरखडे सुवर्णा परचाके हेमलता मरापे माया सोयाम सुरेश सुभाष चांदेकर काशिनाथ मेश्राम कुणाल कुडमेते रमेश गेडाम रवी कनाके महादेव श्रीराम गोकुळ तोडसाम नागेश मडावी लखन मेश्राम अशोक गिरडकर विक्रम श्रीराम मारुती कनाके लक्ष्मण समाज बांधव उपस्थित होते.