दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत ग्रामपंचायत तुळाजा या ठिकाणी आयुष्यमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेस सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. या ग्रामसभेमध्ये(आयुष्यमान) विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यात प्रामुख्याने आरोग्य विषयावर महत्वपूर्ण चर्चा झाली.व ग्रामस्थांच्या हितासाठी व त्यांची आरोग्य विषयक माहीती त्यांना अद्ययावत ठेवता यावी याकामी प्रत्येकाचे आभा कार्ड बनवणे,तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास मोफत उपचार घेता यावेत यासाठी आयुष्यमान कार्ड बनविणे.तसेच आयुष्यमान कार्डाचे वाटप करणे.इत्यादि बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी डॉ.अरुण लांडगे यांनी उपस्थितांना विविध होणारे आजार व त्यावरील उपचार.तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना.आणि त्याद्वारे मिळणारे लाभ याविषयी उपस्थितांना त्यांनी माहिती दिली. नेहमी उद्भवणारे आजार ज्यामध्ये जलजन्य, किटकजन्य याबाबत लोकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना या विषयी ही अवगत केले. तुळाजा गावात टी.बी. बाबत नेहमी जनजागृती करणारे संदीप राहसे यांचाही यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सभेसाठी सरपंच मिरा राहसे, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम राहसे, आरोग्य अधिकारी डॉ.अरुण लांडगे,डॉ.इमरान शेख,ग्रामसेवक प्रवीण खाडे, विक्रमसिंग डूमकूळ,रोजगार सेवक अंबरसिंग राहसे,लक्ष्मण पवार,ग्रामपंचायत सदस्य वंदनाबाई खर्डे, दिलीप पवार,सुरज राहसे, पिंट्या डूमकूळ, तसेच नर्स,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

