प्रमोद अहिनवे
तालुका प्रतिनिधी जुन्नर
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आमरण उपोषणास सुरवात व जोपर्यंत अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकावर संस्था चालक,शिक्षण अधिकारी व पोलिस प्रशासनाने कायदेशिर कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण चालु चं रहाणार.ऐक शिक्षण संस्थेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत व्हाटसअॅप चॅटिंग व त्यासंदर्भात शाळकरी मुलीसोबत बोललेले ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर प्रसारित झाले असुन हा प्रकार झाल्यावर सदर संस्था चालकांनी स्वतः हा जबाबदारी घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकावर कायदेशिर कारवाई करणे अपेक्षित होतं पण तसे न केल्यामुळे उपोषणास ओतुर ग्रामस्थांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे .

