दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा :-पी.ई.सोसायटी संचलित शेठ के. डी. हायस्कूल तळोदा येथे शाळेचे मुख्याध्यापक.जे.एल. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.त्याचबरोबर स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील राबविण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक ए.बी.वायकर हे होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी.एम.वानखेडे यांनी तर प्रास्ताविक पर्यवेक्षक पी.पी.पाटील यांनी केले. गांधीजींचे सगळ्यात लोकप्रिय भजन रघुपती राघव राजाराम व वैष्णव जन ही भजने जे.आय.राणे यांनी गात उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मनोगतामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षक पी.बी.राजपूत यांच्या कडून रोख बक्षिस देण्यात आले.शेवटी आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.आभार पी.बी.राजपूत यांनी मानले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एल.सुर्यवंशी, उपमुख्याध्यापक ए.बी.वायकर, पर्यवेक्षक पी.पी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगिनी उपस्थित होते.छायाचित्रे ए.पी.सोनार,व्हि.बी. पगार यांनी काढले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.सामुहिक राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


