कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आज १ऑक्टोबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम राबविण्यात आला.शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केल्या नुसार या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला. शालेय परिसर व शाळे जवळील परिसराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. तसेच शिवाजी चौकातील प्रांगणाची स्वच्छता करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भास्कर सर, व सर्व शिक्षक वृंद तसेच सोनाळा ग्रामपंचायत चे सरपंच हर्षल खंडेलवाल, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेशखोकले,भाजपा.खामगाव जिल्हा चिटणीस प्रमोद गोसावी,सदस्य सुधीर लव्हाळे शिवाजी काटकर,नरसिंमा पिंजरकार,प्रमोद इंगळे,जानराव गोरे, अनिल कुकडे,मोहन ठोकणे व ग्रामस्थ सहभागी झाले होते.