दादासाहेब येढे
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
पाथर्डी :- व्यवसायीक शिक्षण ही आज काळाची गरज निर्माण झाली असुन व्यवसायीक शिक्षणाबरोबर स्वच्छता आणि सेवा करण्याची वृत्ती विदयार्थ्यांनी स्विकारली तर जिवनामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी श्री क्षेत्र मोहटादेवी, ता पाथर्डी येथे व्यावसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन पाथर्डी येथील औदयोगीक प्रशिक्षण केंद्र पाथर्डी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्यभिषेख निमित्ताने गड किल्ले यांची सफाई करण्यासाठी स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येते आहे त्या अंतर्गत मोहटा देवी गडाची स्वच्छता करतांना केले.
या स्वच्छता मोहीमे वेळी प्राचार्य अजय वाघ, प्राचार्य उत्तम लोखंडचुर, काकासाहेब शिंदे, विष्णपंत अकोलकर, डॉ.मृत्युंजय गर्जे, बंडु पठाडे, जमिरभाई आतार, शिवाजीराव मोहीते गडाचे व्यवस्थाक सुरेश भणगे, सरपंच सौ. शितल दहिफळे, प्रा.सौ. ज्योती बडे, प्रा.सुरेश जावळे, प्रा.पांडुरंग पोले, प्रा.मनोज नांदोडे, प्रा.ज्ञानेश्वर सुपेकर,प्रा.जससिंग बेळगे आदि यावेळी उपस्थित होते
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेख निमित्ताने व्यवसाय शिक्षण मंडळाने राबविलेल्या या पंधरवाडयामध्ये या औदयोगीक प्रशिक्षण संस्थेतील 90 विदयार्थ्यांनी दिवसभर परीसरातील प्लास्टीक, तसेच इतर कचरा गोळा करुन स्वच्छता केले तसेच स्थानिकांना स्वच्छते विषयी जागृती करण्यात आली यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी औदयोगीक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणा-या सर्व आवश्यक सोयी सुविधा स्वतंत्र नविन इमारत शासनाकडून उपलब्ध करुन देणेत आलेल्या असुन अजुनही आवश्यक ती मदत करण्यात येईल परंतु परीसरातील विदयार्थ्यांना या संस्थेच्या विविध कोर्सेस चा उपयोग कसा होईल व विदयार्थ्यांना त्याचा कसा फायदा करुन घेता येईल याकडे सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले

