रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
बुलडाणा अर्बन चे सर्वेसर्वा सहकाराचा पांडुरंग सहकार महर्षी श्री. राधेश्यामजी चांडक , भाईजी यांच्यावाढदिवसा निमित्त अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी , उमाकांत राखोंडे यांच्या मार्गदर्शनात शाखा तेल्हारा तर्फे ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे शाखेचे सर्व स्थानिक संचालक व शाखा व्यवस्थापक रामदास भालेराव यांचे हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या स्व मालकीच्या शाखा तेल्हारा येथील गोदाम वर वृक्षारोपण करण्यात आले व तीर्थक्षेत्र वागेश्वर येथे सुद्धा वृक्षा रोपण करून तसेच त्रिवेणी संगमी वांगेश्वर संस्थान बाबुळगाव चे प्रबंधक पवनकुमार चांडक, संचालक बाळूभाऊ ताथोड, उपसरपंच विजय इंगळे, सरपंच पती मंगेश कोकाटे, सामाजिक कार्यकर्ता अरुण वैतकार, श्रीकृष्ण हेरोंडे यांचे उपस्थितीत अभिषेक करून भाईजी च्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली.याप्रसंगी प्रामुख्याने शाखा तेल्हारा येथील स्थानिक संचालक घनश्यामदास मंत्री, अरविंद अवताडे, जुगलकिशोर भारुका, डॉ. अशोक तापडिया तसेच शाखेचे कर्मचारी मुरलीधर मंत्री, रमेश भटकर, नितीन तीवाने, पवन बासू, सौ. सीमा फापट मॅडम, कु. चंचल बजाज मॅडम, संतोष वाने, सुनील दांडगे, सौ. कमल मोरे, रमेश कराळे, नंदु ठाकूर यांची उपस्थिती होती.