प्रमोद अहिनवे
तालुका प्रतिनिधी,जुन्नर
मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मया॔.ओतुर ची 7वी वार्षिक सव॔साधारण सभा शनिवार दिनांक.30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा मोनिका हाॅल,मोनिका चौक येथे पतसंस्थेच्या अध्यक्षा.निलीमाताई संभाजीशेठ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेचे प्रास्ताविक श्री.बाळासाहेब हरकुजी डुंबरे यांनी केले.अहवाल सालात 4,28,78,270/-(चार कोटी अठ्ठावीस लाख अठ्ठयाहत्तर हजार दोनशे सत्तर रूपये ) कज॔वाटप केले आहे.संस्थेची सभासद संख्या 1940 आहे . संस्थेची एकुण गुंतवणूक ऐक कोटी तिन लाख ऐक हजार शहाण्णव
रूपये आहे.याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.ललिता सुभाष शेटे,सचिव सौ.मोनिका आशिष शहा,संचालिका कल्पना खामकर,अश्विनी ढमाले,मंगल खेत्री,रोहिणी बावबंदे,लता ठिकेकर,संगिता.ब.काळे,तज्ञ संचालिका संगिता काळे,वैशाली बोचरे उपस्थित होत्या.संस्थेच्या कायदेशिर सल्लागार सौ .वृषाली अजित मोरे,मांडवी किनारा पतसंस्थेच्या संचालिका सौ.सुशिला विलास तांबे,मंजुषा हरिश्चंद्र डुंबरे उपस्थित होत्या.मनोगत व्यक्त करताना सौ.ललिता गणपत डुंबरे संस्थेच्या काय॔बद्दल कौतुक व्यक्त केले.मा.अध्यक्षाच्या भाषणानंतर पसायदान घेऊन सभेची सांगता झाली.