महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून येथील पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरीत युवा केंद्र स्वाध्याय परिवारातर्फे “मेरी मर्जी” हे पथनाट्य वार्डावार्डात व आजूबाजूच्या गावांमध्ये युवा केंद्राच्या युवकांनी उत्स्फूर्तपणे सादर केले. भद्रावती शहरात गुरुनगर, भोजवार्ड, किल्लावार्ड, अहिल्यादेवी नगर, साने गुरुजी नगर, दाते सोसायटी, सावरकर नगर इ. ठिकाणी तसेच तालुक्यातील टाकळी, पानवडाळा, घोडपेठ, चालबर्डी, कोंढाळी इत्यादी गावांत पथनाट्य सादर करण्यात आले.
पथनाट्यातून आजच्या तरुणांमध्ये ‘माय लाईफ मेरी मर्जी’ याविषयी असलेली भावना व त्यामुळे पालक आणि तरुण यांच्यात होत असलेला वैचारिक संघर्ष व त्यातून तरुणांचे बिघडणारे वर्तन तसेच व्यवहारी जीवनातील काही प्रसंग या पथनाट्यातून सादर केलेत.भर पावसातही दि.६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर पर्यंत युवाकेंद्राच्या युवकांनी आपले सांस्कृतिक कार्य पूर्ण केले.