महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे खास तान्हा पोळा सणाचे औचित्य साधून बालगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पालकांनी केलेल्या विनवनीला प्रोत्साहन देत महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांच्या तर्फे आयोजित तान्हा पोळा नंदीबैल सजावट स्पर्धा चंदनखेडा येथील बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहाने पार पडली.यावेळी प्रथम बक्षीस निखिल सुधाकर दोडके, द्वितीय बक्षीस ओमकार प्रमोद राखुंडे, तर तृतीय बक्षीस नितेश बाबाराव घुग्गूसकर यांना प्राप्त झाले. महात्मा गांधी तंटामुक्त समिती कडुन विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विपीन इंगळे, पोलिस-उपनिरीक्षक अमोल कोल्हे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सहभागी संपूर्ण नंदी बैल सजावट स्पर्धेकांना शौर्य क्रिडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांच्याकडून शैक्षणिक साहित्यासह प्रोत्साहन पर साहित्य देण्यात आले.यावेळी शौर्य क्रिडा मंडळाचे आशिष हनवते, अमित नन्नावरे, शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, राहुल चौधरी, मंगेश हनवते, गणेश हनवते,दिलीप ठावरी, देवानंद दोडके,शंकर दडमल,भुपेश निमजे, पंकज दडमल, प्रविण भरडे , सिंगलदिप पेन्दाम, दिलीप कुळसंगे, प्रकाश भरडे, संकेत बुरेवार, अमोल महागमकार, प्रज्वल बोढे, शंकर दडमल,भुपेश बोढे, स्वप्निल दडमल, यांनी मोलाचे सहकार्य केले. गावातील युवा वर्ग, महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आशिष हनवते यांनी केले तर प्रास्ताविक मनोहर हनवते यांनी केले तर आभार शुभम भोस्कर यांनी मानले.


