मोहसिन शेख,
शहर प्रतिनिधी, वसमत.
वसमत – तहसिल कार्यालय, वसमत यांच्यावतीने नवमतदार जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन वसमतचे उपविभागीय अधिकारी श्री. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते झाले.यावेळी वसमतच्या तहसिलदार सौ. दळवी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत श्री योगानंद स्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. नवमतदार जनजागृती अभियान मोहिमेत श्री योगानंद स्वामी महाविद्यालयाने सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.मीरा नाकाडे, डॉ. बाळासाहेब भिंगोले, श्रीमती मीना मुकाडे, रासेयो स्वयंसेवक दीपक सावंत, सचिन मंत्री, कु. समीक्षा खंदारे, कु. कल्याणकर, कु. भीमाताई एंगडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने सहभागी झाले होते.