बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : नागपंचमी निमित्त सणाचे महत्त्व, भारतीय संस्कृती सणाचे महत्त्व लोप पावत चाललेले आहे. त्याचे जतन करण्यासाठी आपले भारतीय सण कसे साजरे केले जातात याबाबत श्रीमती .रंभाबाई गुलाबचंद कटारिया बोरीबेल ता. दौंड या शाळेचे मुख्याध्यापक संभाजीराव कावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सहशिक्षिका सुनिता साबळे, अपेक्षा कदम ,रेश्मा जगताप यांनी नागपंचमी सणानिमित्त कार्यक्रमाचे संयोजन केले होते. त्याप्रसंगी विद्यालयातील कुमारी आकांक्षा खोमणे ,कुमारी वैभवी कुंभार, कु ऋतुजा गावडे, कुमारी प्रणिता पाचपुते, कुमारी नंदिनी खळदकर, कुमारी श्वेता डोईफोडे, कुमारी वैष्णवी महाडिक,कुमारी पूजा खोसे, कुमारी सायली गावडे,कुमारी शिवानी जगताप यांनी तसेच सर्व विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन नागपंचमी सण दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी फेर धरून नृत्य ,झिमा फुगडी , पतंग उडवणे , हळदी कुंकू एकमेकीस औक्षण केले. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक संभाजी कावळे सर यांनी सर्व सहभागी मुलींचे तसेच संयोजन करणाऱ्या उपशिक्षिका यांचे कौतुक व अभिनंदन केले.