सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड दि. 12 गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब (RRC) इनर व्हील क्लब, केंद्र कुटीर रुग्णालय उमरखेड यांचे द्वारे जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या विविध चाचण्या जसे सी.बी.सी., कम्प्लीट ब्लड अकाउंट एच.आय.व्ही. गुलकुझ काउंट, सिरम युरिया इत्यादी रक्त चाचण्या घेण्यात आल्या. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी फेसबुक लाईव्ह या माध्यमातून आरोग्य विभाग मार्फत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्याचे थेट प्रसारण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यासोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सुद्धा आवर्जून भाग घेतला. स्पर्धेसाठी विशेष प्राविण्यपात्र विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बक्षिसे देण्यात आले.
12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन जगभरातील काही तरुणांना भेडसावणाऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रित करतो.
सहा ते 13 वयोगटातील अर्ध्या मुलांमध्ये मूलभूत वाचन आणि गणित कौशल्ये नसतात आणि बालपणातील गरिबी अजूनही जागतिक स्तरावर एक प्रचलित समस्या आहे या समस्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी UN द्वारे आंतरराष्ट्रीय युवा दिन तयार करण्यात आला. जगभरातील तरुणांच्या उपलब्धींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो.
कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब चे अध्यक्ष श्रीमती प्रीतीताई धामनकर, डॉ. विमल राऊत, सौ सरोज मांडवगडे, डॉ. शितल धोंगडे सौ. वर्षा चिरडे, सौ. विना बोनगुलवार सौ. सुंनदा कदम, प्रा. डॉ. वसुंधरा कदमच्या उपस्थित होत्या उद्या सोबतच कुटीर रुग्णालय उमरखेड येथील सौ. वैशाली घोंगडे (RRC), श्री. देवानंद ताटे, श्री. निशांत कदम, श्री. अमर लोमटे यांनी रक्ताच्या विविध चाचण्या घेतल्या.
अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयात राबविण्यात येतात व त्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक रुंद व प्रशासकीय कर्मचारी यांचे मार्गदर्शन व पाठबळ विद्यार्थ्यांना लाभते.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. सौ. ए. पी. मिटके व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.










