शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
ग्रामपंचायत शेंबा खुर्द आणि महाळुंगी येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत ध्वजारोहण,पंचप्रण शपथ, माजी सैनिकांचा सत्कार समारंभ व ७५ देशी वृक्ष लागवड इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले,त्यावेळी नोडल अधिकारी डाॅ.दळवी साहेब तसेच ग्रामपंचायत सचिव अजयासिंग जाधव मा.उप सरपंच सौ रमाबाई दाभाडे ग्राम पंचायत सदस्य दिपक दाभाडे व प्रतिष्ठित नागरिक श्री निखिल पाटील, जिवन पाटील, सुभाष दाभाडे, शंकर दाभाडे,विश्वास डिवरे , इतर ग्रामपंचायत पदाधिकारी,कर्मचारी तसेच मा.सैनिक गजानन खोलगडे स्वा.सैनिक श्री रामराव पाटील गावातील नागरिक,शिक्षक व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महाळुंगी येथील आयोजित कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी तसेच गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.