भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: आज दि 13 रोजी आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अँड अर्जुनराव जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते उपप्राचार्या श्रीम रूपा खेडकर उपमुख्याध्यापिका सौ मंदाकिनी भालसिंग पर्यवेक्षिका श्रीम पुष्पलता गरुड पर्यवेक्षक सुनीलजी आव्हाड शिवाजी पोटभरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अँड अर्जुनराव जाधव यांनी उपस्थितांना शुभ संदेश दिला.यावेळी बोलताना ते म्हणाले की पूर्वजांच्या त्यागाने कष्टाने आणि बलिदानाने भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले.आज भारत देश विविध क्षेत्रात प्रगती करत आहे.आपल्या देशाला जगाच्या पाठीवर बलशाली भारत बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतिमा उकिर्डे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.