नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी. महागाव
भारतीय जनता पार्टी महागाव च्या वतीने “मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत वेणी (बु ) येथे अमृत सरोवरचे (पुस धरण)पूजन उमरखेड/महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.सरोवराच्या काठावरील पवित्र मातीचे पूजन करून, कळसांमध्ये माती भरण्यात आली.व मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून उपस्थित नागरिका कडून पंचप्राण ची शपथ घेण्यात आली. ग्रामपंचायत वेणी (बु) कडून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या बलिदानाच्या शिलालेखाचे यावेळी पुष्पहार घालून सर्वांनी अभिवादन केले व वृक्षारोपण केले.यावेळी आमदार नामदेवराव ससाने,भाजपा तालुका अध्यक्ष दीपक आडे,तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी,सुरेश पाटील नरवाडे,समाधान पाटील वानखेडे,गोविंदराव शिंदे,सरपंच परसराम पुंडे,विनोद शिंदे,एड.कैलास वानखेडे राहुल आडे शुभम गरुड,श्रीधर भगवानकर,किरण भोपळे,संजय राऊत,प्रभाकर कदम,सुदर्शन देशमुख,सुदाम देवडे, गणेश पुंडे,मधुकर राठौड,सुदर्शन पुंडे, शिवाजी बगळे व शक्ती केंद्रप्रमुख,बूथ प्रमुख,पदाधिकारी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.











