डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
परभणी: दि.12 ऑगस्ट आझादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून ग्रामविकास व पंचायतराज विभागाने राज्य सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी इमारतींवर व नागरीकांनी स्वतःच्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करावी, असे आवाहन केले आहे.परभणी जिल्ह्यातही हर घर तिरंगा या मोहिमेतून 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान शासकीय व निमशासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था तसेच खाजगी आस्थापना व घराघरांवर नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्र ध्वजाची उभारणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.