सईद कुरेशी
शहर प्रतिनिधी, नंदुरबार
नंदुरबार : येथे दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने नंदुरबार विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद आयोजित करून, माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. यात प्रामुख्याने नंदूरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळास विनम्र अभिवादन, तदनंतर नंदुरबार तालुका विधायक समितीच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या तालुक्यातील खोकसा व सुतार पाडा येथील शाळांच्या इमारतीचा नामकारणाचा कार्यक्रम तसेच नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार, तसेच नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन व या कार्यक्रमास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल पाटील विधान नवपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश नाईक तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या समवेत नंदुरबार शहरातील व परिसरातील विविध संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार, उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.









