सईद कुरेशी
शहर प्रतिनिधी, नंदुरबार
नंदुरबार:-एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने सहायक प्रकल्प अधिकारी तळोदा के सी कोकणी यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात असे म्हटले आहे. तोरणमाळ शासकीय आश्रमशाळेत सहा वर्षीय विद्यार्थ्याचा झोपेत असताना, मृत्यू झाला त्याची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याबाबत, धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे इयत्ता पहिलीत शिक्षण घेणारा शासकीय आश्रम शाळेतील सहा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी झाली आहे. आदिवासी समाजातील शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या गरीब व्यक्तीच्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न पैकी एक भाग हा आश्रमशाळा आहे. साबलापाणी, धडगाव येथील मयत देवा दिला पाडवी (वय 6) हा विद्यार्थी तोरणमाळ येथील शिकत होता. विद्यार्थ्यांच्या मृत्यू शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला. शासकीय आश्रम शाळेत पहिलीत शिक्षण घेत होता. तो अचानक आजारी पडला. त्याच्या पोटात दुखत असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी डेबा याचा झोपेतच मृत्यू झाला. तरी या दुर्देवी घटना संशयित असल्याने अनेक प्रश्न समजा पुढे येत आहे. तरी खालील मुद्द्याचे चौकशी करून न्याय द्यावा. शासकिय आशरमशाळेतील मृत्यू पावलेल्या विद्यार्थी हा शाळेत असताना त्यास डॉक्टरांनी पुरवेल औक्षधोपचार तपशील मिळावा, मुलांचे आरोग्यासाठी तपासणी शिबीर आयोजीत का केले नाही ? आय फल्यु हा रोग व इतर साथीचे रोग सतत सुरु असताना, कंत्राठी आरोग्य सेविका 24 तास मुख्यालयी राहण्याकरिता का नेमणूक शालेय व्यवस्थापन
समीती अनुदान किंवा प्रकल्प स्तरावरून करण्यात आली नाही?, मृत्यू पावलेल्या विद्यार्थी हा सिक रूम मधे का ठेवण्यात आले नाही? त्याचापाशी कामाठी अथवा अधिक्षक ने रात्री का थांबले नाही ? रात्री पाळी डयुटी असलेलया कर्मचारी कार्यवाही का करण्यात आली नाही?, प्रकल्प अधिकारी नि मुख्याद्यापक, अधिक्षक, वर्गशिक्षक, संबधीत रात्रपाळी कर्मचारी का कार्यवाही करण्यात आली नाही?विद्यार्थी हा त्यच्या पालकांच्या भविष्यातील आधारस्तंभ असल्याने त्याची कमी पूर्ण करू शकत नाही परंतु त्यास मयत विद्यार्थीच्या कुटुंबियांना 5 लक्ष आपल्या स्तरावर तात्काळ मदत करून शासन नियम नुसार त्यास अनुदान तत्काळ प्राप्त करून द्यावा व कुटुंबातील एका व्यक्तीस रोजंदारी वर्ग 3 किवा वर्ग 4 मधे सेवेत घ्यावे. जोपर्यंत चौकशी होत आहे तोपर्यंत तेथील मुख्याध्यापक अधीक्षक वर्गशिक्षक कर्मचारी तात्काळ निलंबन करण्यात यावे. चौकशीनंतर दोषींवर 1989 अधिनियमनुसार भारतीय दंड संहिता 1860 फौजदारी कायदा 1973 व इतर लागू असलेले कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी निलंबन करण्याची कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी, संपत, संजय वळवी, सुनील वळवी, सुदाम नाईक, दिलीप पाडवी आदी उपस्थित होते.









