विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :तालुक्यातील चालगणी ते ब्राह्मनगाव या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे .जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड येथील अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली असता खरोखरच रस्ता अडवल्याच त्यांच्या निदर्शनास आले .परंतु त्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर न दिल्या मुळे नागरिक आक्रमक होऊन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना जिजाऊ ब्रिगेड यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले.१४ऑगस्ट पर्यंत रस्ता खुला न केल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे .वरिल सर्व बाबींचा गांभियनि विचान न केल्यास परिसरातील सर्व शेतकरी व सर्व गावकऱ्यांना नाईलाजाने उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करावे लागणार आहे.गावकऱ्यांच्या पाठीशी आम्ही जिजाऊ ब्रिगेड उभ्या राहून तीव्र आंदोलन करू त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पुर्णतः प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सरोज देशमुख यांनी दिला आहे.ऐन सत्यावर अतिक्रमण करूण रहीवाशीसाठी असलेला संपूर्ण रस्ता या लोकांनी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा यांस वेठीस धरले आहे.आणि या रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे यावर सर्वत्र खच पडले आहे हे खड्डे संपूर्ण पाण्याने भरलेले आहेत. एकीकडे सत्यावर केलेले अतिक्रमण तर दुसरीकडे सत्यावर ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे रहदारीचा संपूर्ण रस्ता बंद पडला आहे.










