दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी, रिसोड
रिसोड, ता. 11/8/2023: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय रिसोड येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र स्थापन झाले असुन नुकतेच उद्घघाटन सोहळा पार पडला.उद्घघाटन सोहळ्या करीता कार्यक्रम अध्यक्ष म्हनून सुविदे फाऊंडेशन कृषि महाविद्यालय रिसोड येथील अध्यक्ष मा.मंत्री तथा मा.खा आदरणिय श्री अनंतरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीसह संस्थेचे विश्वस्त सन्माननिय श्री चैतन्य अनंतराव देशमुख यांची उपस्थिती लाभली.सदरील उद्धघाटनसोहळ्या करीता प्रमुखं अतिथी म्हणून माननीय श्री देवेंद्रसिंग ठाकूर पोलीस निरिक्षक रिसोड समवेत तालुका कृषी अधिकारी कु.काव्याश्री घोलप यांची उपस्थीति लाभली.सर्वप्रथम कार्यक्रमांचे अध्यक्ष आदरणीय अनंतरावजी उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या समवेत सर्व सन्माननीय अतिथीगन यांच्या व्दारे कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले तद्नंतर कृषि महाविद्यालय रिसोड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आणि गुणगौरव सोहळा सन्माननीय श्री अनंतरावजी देशमुख यांच्यासमवेत अतिथीगन यांच्या व्दारे करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि महाविद्यालय रिसोड येथील प्राचार्य डॉ.ए.एम.अप्तुरकर यांच्याद्वारे करण्यात आले.कृषि शिक्षण काळाची गरज आणि आपल्या परिसरात त्यांची संधी उपलब्ध झाली त्यांचे सार्थक सर्व विद्यार्थ्यानी करावे असा मोलाचा संदेश यावेळी बोलताना प्रमुख देवेंद्रसिंग ठाकूर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.कु.काव्याश्री घोलप कृषि अधिकारी रिसोड यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थि वर्ग यांना कृषि मधील व्यवसाय व नोकरी मध्ये कृषि शिक्षणाचे महत्त्व आणि ज्ञानगंगा घरोघरी या घोषवाक्याला सार्थक करीत सर्व विद्यार्थ्यांना एक संधी निर्माण झाली म्हनून त्या दृष्टीने आपले ध्येय सिद्ध करावे असे यावेळी मनोगत व्यक्त केले . आपल्या अध्यक्षीय भाषणातून आदरणिय अनंतरावजी देशमुख यांनी सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात व करडा सारख्या ग्रामीण भागात कृषी महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त कृषि विद्यापीठ शिक्षण केंद्रं स्थापन करण्यामागचा हेतू, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा समस्या, शेतकरी वर्ग यांचे पाल्यांना उत्तम शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे थोडक्यात वाशीम जिल्ह्याचा शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वागीण विकास साधणे हा असून कृषि शिक्षण आधिक पारदर्शक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन करुण उपस्थीत विद्यार्थि वर्ग यांस शुभेच्छा दिल्यात.आभार प्रदर्शन कृषि विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय रिसोड येथील प्रा.जी.आर गोहाडे यांनी केले.संपूर्न कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्मानिय श्री आर.एस.डवरे विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ के व्हीं.के वाशीम यांनी केले.सदरील उद्धघाटन सोहळा यशस्वीपणे संपन्न होणे करीता संपूर्ण कर्मचारी वृंद कृषि महाविद्यालय रिसोड यांचे विशेष सहकार्य लाभले.