रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा _अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक उपकरणांसह अकोट शहरात प्रथमच धांडे हॉस्पिटल व स्क्रीन क्लिनिकच्या विस्तारित भव्य शुभारंभ 13 ऑगस्ट रविवारला सकाळी अकरा वाजता आप्पास्वामी कॉलनी शहर पोलीस स्टेशन समोर अकोला रोड अकोट या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.डॉ. निखिल धांडे व डॉ. प्रियल लढढा धांडे यांच्या धांडे हॉस्पिटल व स्किन क्लिनिकचाशुभारंभ कडू खेमाजी धांडे व सौ सुरेखा कडू धांडे यांच्या हस्ते, महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, पदमश्री डॉ.रवींद्र कोल्हे, पदमश्री डॉ. स्मिता कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर माजी राज्यमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावतीचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आ रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकडे ,आमदार अमोल मिटकरी, माजी गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, लोकसभा संपर्कप्रमुख अनुप धोत्रे, सहकार नेते हिदायत पटेल, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक नानासाहेब हिंगणकर, राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष एड. गजाननराव पुंडकर, ओझोन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला चे अध्यक्ष डॉ.विनीत हिंगणकर, डॉ. के एस पाटील मल्टीपर्पज फाउंडेशन अकोला चे डॉ. अभय पाटील बोराखडे, हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुभाष बोराखडे, लोखंडे हॉस्पिटलचे संचालक डॉ.सचिन लोखंडे,अकोट येथील उद्योजक प्राध्यापक नवनीत लखोटीया, उद्योजक अक्षय ठोकळ व दूध उत्पादक संघ अकोला चे अध्यक्ष रोहित राजेंद्र पुंडकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. 13 ऑगस्ट ला उद्घाटन होऊ घात लेल्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक उपकरणांसह पांढरे डाग इसब केस व नखांचे रोग वांग गजकर्ण कृष्टरोग सोरायसिस खरुज गुप्तरोग नागीणर रोगावर निदान व उपचार तसेच ओघळलेला कानदुरुस्त करणे, तीळ काढणे, मार लागलेला किंवा अपघाता नंतर जखमेचे निशाणाची सर्जरी करणे, चामडीचा तुकडा काढून तपासणी करणे, पांढरे डागावर औषध उपचार व सर्जरी अनावश्यक केस काढणे, मुरुमाचे खड्डे कमी करणे, मस काढणे केस गळणे, आधी सुविधा या अत्या धुनिक हॉस्पिटलच्या अनुषंगाने सेवेमध्ये राहणार आहेत शहरात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक उपकरणांसह शुभारंभ होत असलेल्या धांडे हॉस्पिटल व स्क्रीन क्लिनिक मध्ये हृदयरोग मधुमेह मेंदू रोग व किडनी विकार तसेच चर्मरोग सुविधा अत्याधुनिक व नव तंत्रज्ञानाने सोयी युक्त सेवा उपलब्ध राहणार आहेत तसेच हृदयरोग उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराइड, ग्रंथीचा आजार, फुफ्फुसाचे आजार, क्यूमोनिया दमा, टीबी, मेंदू रोग, मेंदू ज्वार, टायफाईड, मलेरिया, डेंगू, कॉलरा, क्षयरोग किडनीचे विकार, श्वसन विकार, पोटाचे विकार आतड्याचे विकार, संधिवात व सांधे दुखी, विषबाधा, सर्पदंश, आदि सुविधांचा या हॉस्पिटलमध्ये समावेश आहे.