फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
उदापूर : विविध कार्यकारी सोसायटी उदापूरची वार्षिक सभा सोसायटीचे विद्यमान चेअरमन संजय बुगदे यांच्या अध्यक्षतेखाली अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी प्रथम गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ व सहकार महर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांच्या प्रतिमेला हार घालून नमन करून सभेला सुरुवात करण्यात आली.तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्यावतीने सर्व सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला तसेच क्रियाशील सभासदांना संबंधी निकष पूर्तता व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उपविधी दुरुस्तीची माहिती त्याचप्रमाणे सोसायटीचा आलेख उंचावण्यासाठी सर्व सभासदांनी वज्रमूठ करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन राजेंद्र मोहिते यांनी केले तर पर्यावरणाचा होणारा रास रोखण्यासाठी उदापूर सोसायटी एक पाउल पुढे येऊन इलेक्ट्रिक किंवा गॅस शवदाहिनी उभारण्याची प्रस्तावना गावकऱ्यांसमोर मांडली तसेच शेतकऱ्यांसाठी “विष मुक्त शेती” अभियान व नवनवीन उपायोजना राबवणार असल्याचे चेअरमन संजय बुगदे यांनी सांगितले. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळून शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून आपली माती वाचवावी असा संदेशही देण्यात आला.
तसेच उदापूर ग्रामपंचायत च्या वतीने “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान राबवण्यात येणार असून या अभियानाची माहिती ग्रामसेवक मच्छिंद्र कवडे व सरपंच सचिन आंबडेकर यांनी दिली गावातील सर्व आरोग्य सेविका अंगणवाडी, सेविका, बचत गटातील महिलांनी वृक्षारोपण करण्यासाठी जनजागृती करून गावातील सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन ग्रामपंचायत उदापूरच्या वतीने करण्यात आले.यावेळी व्हाईस चेअरमन कैलास कुलवडे, संचालक अनिल भुजबळ, संतोष होनराव, नारायण शिंदे, ज्ञानेश्वर चौधरी, नामदेव शिंदे, प्रकाश शिंदे, गोविंद माळवे, सुभाष कठाळे, तुळशीराम शिंदे, सुलोचना शिंदे, मिनाबाई कुलवडे, सचिव मारुती बनकर, लेखनिक दत्तात्रय बोराडे, बबनदादा कुलवडे, प्रभाकर शिंदे, जालिंदर शिंदे, दत्तात्रेय आरोटे, राजू अमुप, प्रमिला शिंदे, रघुनाथ शिंदे, बाजीराव शिंदे, मुरलीधर भास्कर, सर्व सभासद, शेतकरी, समस्त ग्रामस्थ उदापूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.