महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती दि.12:- चंद्रपूर:- महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई तर्फे महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिटीगुडा नं १ द्रारा संचालीत श्री दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र मधुबन प्लाझा चंद्रपूर तुकम चंद्रपूर येथे दिनांक २४/४/२३ते २४/७/२३ पर्यंत गेल्या ९० दिवसा पासून सुरू होते त्यामध्ये लेखी परीक्षेसह,मैदानी चाचण्यासुध्दा घेण्यात आल्या.या निवासी पोलिस भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र मध्ये क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले व हे नव्वद दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.त्यानिमित सोमवारी दि २४/७/२०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता प्रशिक्षणार्थीचा निरोप समारंभ तथा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक दिगांबर जाधव संस्थापक अध्यक्ष, होते तसेच प्रमुख पाहुणे मा,श्री राहुलजी चव्हाण साय्यक पोलिस निरीक्षक चंद्रपूर महेश निमसटकर, राहुल राठोड सर, सचिन जिवतोडे फिजीकल,कोच सर, दिलीप ताटेवाड सर अमित जी मेश्राम सर, महिला वर्डन आब्बेसुमा पठाण मॅडम, महिला रक्षा गार्ड सिंधुबाई ठमके, छाया सोनवने, चौधरी मॅडम इत्यादींची उपस्थित होती.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, निवासी पोलिस भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले.तेव्हा आपण आपल्या आई -वडिलांचे नाव उज्ज्वल केले पाहिजे, तसेच आपण भावी पोलिस नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या पदांवर कार्यरत होणार आहेत.त्यामुळे आपण आपल्या कार्यास सलाम करुन आपले ध्येय साध्य करण्यासाठी चांगले परिश्रम घेतले पाहिजे.व आपण निश्चितपणे या निवासी पोलिस भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेवून येणा-या समोरच्या पोलीस भरतीत यशस्वी व्हाल यासाठी आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी जय हिंद, जय सेवालाल,जय महाराष्ट्र सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे आदरणीय श्री राहुलजी चव्हाण साहेब साय्यहक पोलिस निरीक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.राहुलजी राठोड सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, संस्थेचे सचिव सौ स्वाती जाधव, दिगांबर नाईक सहसचिव, कैलास जी जाधव कोषाध्यक्ष,प्रकाश जाधव सदस्य, वनिता जाधव सदस्य,विमल जाधव सदस्य, अरुण जाधव सदस्य आब्बेसुमा पठाण मॅडम महिला वार्डन यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केशवर्य वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन करुणा रामटेके यांनी मानले. तसेच प्रशिक्षण पूर्ण करणार्या मूलाना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.


