डॉ. शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
सेलू:दि. 12 ऑगस्ट रोजी श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्म दिवस ग्रंथदिन म्हणून साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेतील मुख्याध्यापिका सौ.संगीता खराबे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल,जेष्ठ शिक्षक सुहास देऊळगावकर,शंकर बोधनापोड,सेवानिवृत ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे प्रशालेतील विध्यार्थीनी कु.काष्टे श्रीजला रंगनाथराव इ. 7वी क हिने रंगनाथन यांच्या कार्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सौ.संगीता खराबे यांनी वाचनाचे महत्व पटवून दिले व पर्यवेक्षक मोगल सर यांनी
ग्रंथमित्र पुरस्काराचे स्वरूप समजावून सांगितले.तर ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे यांनी डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमास सुहास देऊळगावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास रंगनाथराव काष्टे, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विध्यार्थीनी उपस्थित होत्या.