विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :बोगस भामटा राजपूत या प्रकरणावर विधान परिषदेत sit स्थापन स्थापन करण्याची घोषणा करणाऱ्या आपल्या शासनाने दुसऱ्याच दिवशी पलटी मारत sit रद्द करण्याची घोषणा केली .पलटी मारणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध,विमुक्त जाती संवर्गात घुसखोरी करणाऱ्या राजपूत जातीतील बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या व घेणाऱ्या विरुद्ध sit चौकाशी स्थापन करून कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत पलटी मारत sit स्थापन करण्याची घोषणा याच्यात माझी चूक झाली sit स्थापन करण्यात येणार नाही .अशी घोषणा केली तीन-चार दिवसांपूर्वी आमदार राजेश राठोड व नीलय नाईक यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना sit स्थापन करण्याची घोषणा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाने पलटी मारून विमुक्त भटक्या समाजाला धोका दिला आहे .त्यामुळे राष्ट्रीय बंजारा परिषद यामुळे शासनाचा तीव्र निषेध करीत आहे.
राजपुत सुवर्ण समाज असून राजपूत भामटया जातीचा नावाचा फायदा घेऊन विमुक्त जाती प्रवर्गातील आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबाबत विविध लोकशाही मार्गाचा अवलंब करून विमुक्त जातीची मंडळी हे संपूर्ण प्रकरण आपल्या लक्षात आणून देत आहे.
शासन पहिल्या दिवशी sit घोषणा करते व दुसऱ्या दिवशी परत घेते ,शासनाची ही दुहेरी भूमिका संशय निर्माण करणारी असून खुद महाराष्ट्र सरकारच हा खेळ खेळत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
महोदय सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य असून शासन विमुक्त जातीच्या बाबतीत सामाजिक न्यायाची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरस असल्याची भावना विमुक्त जाती समाजबांधवाची झाली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल. असे निवेदन उपविभागीय पुसद मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बहुजन कल्याण मंत्री, पालक मंत्री यांना संजय मदन आडे राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ कार्याध्यक्ष विकास राठोड काटखेडा,अविनाश राठोड माणिकडोह, सतीश चव्हाण असोली, विजय पवार फेट्रा,गजानन राठोड असोली यांनी दिले आहे .











