सुभाष बुरहाडे
शहर प्रतिनिधी, नाशिक
नाशिक : मागील हप्त्यात नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. रुपये १४८ करोड एका कंपनी कडून व्याजाने घेतले त्याची परतफेड काही दिवसात २५० करोड झाली त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. फायनान्स कंपन्याच्या दादागिरी मुळे तेव्हा आताचे सरकार जन सामान्याचे आहे. तेव्हा ह्या सरकारने फायनान्स वाल्यावर बंदी घालावी किंवा फायनान्स कंपन्यावर निर्बंध लावावे.मागील काही वर्षांपूर्वी चोलंमंदल फायनान्स वाल्यांनी एका ट्रॅव्हल वाल्यांची गाडी पॅसेंजर असताना अडवली होती. तेव्हा परिवहन मंत्र्यानी याची दखल घ्यावी अन्यथा असे बरेचसे नितीन देसाई तयार होतील.